धक्कादायक! तलावात बुडून तिघांचा मृत्यू
धक्कादायक! तलावात बुडून तिघांचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहे. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरमध्ये बुडलेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी निघालेली एसडीआरएफच्या जवानांची बोट उलटून मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वेंगुर्ले बंदरातही बोल उलटून चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. 

अशातच नागपुरमध्येही अशीच धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. उमरेड तालुक्यतील कुही पोलीस स्टेशन अंतर्गत मटकाझरी तलावात बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरमधील उमरेड तालुक्यतील कुही पोलीस स्टेशन अंतर्गत मटकाझरी तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक लहान मुलगा आणि दोन पुरुषांचा मृतांमध्ये समावेश आहे. या दुर्दैवी घटनेने मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

नागपूरच्या वाठोडा परिसरातील तीन कुटुंब मटकाझरी तलावर डबा पार्टी करण्यासाठी गेले होते. यावेळी गुरूवारी दुपारच्या सुमारास या कुटुंबातील तिघे तलाव्यात बुडाले होते. आज सकाळी या तिघांचेही मृतदेह सापडले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.  इतर बातम्या
Join Whatsapp Group