दुर्दैवी ! चिमुकलीसमोरच वडिलांचा पाण्यात बुडून मृत्यू ; नेमकं काय घडलं?
दुर्दैवी ! चिमुकलीसमोरच वडिलांचा पाण्यात बुडून मृत्यू ; नेमकं काय घडलं?
img
DB
आंघोळीला गेलेल्या वडिलांचा चिमुकलीसमोर तलावात बुडून मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील बाजारगाव येथील तलावात ही घटना घडली.  

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  अखिल नामदेव शिंदे असं 32 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव आहे. सोमवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अखिल गावातील तलावाकडे आंघोळीला गेले होते. यावेळी त्यांची साडेतीन वर्षांची मुलगी एंजल देखील सोबत होती. तलावाच्या पायरीवर साचलेल्या चिखलामुळे पाय घसरल्याने ते थेट पाण्यात पडले. मात्र पोहता येत नसल्याने काही क्षणातच ते पाण्यात बुडाले. 

एंजलसमोरचे अखिल हे पाण्यात बुडू लागले. त्यावेळी चिमुकली वडिलांना हाक देऊ लागली. वडिलांना बुडताना पाहून ती जोरजोरात रडू लागली.

मात्र तिचं रडणं ऐकून मदतीसाठी यायला तिथे कुणीच नव्हतं. काही वेळातंच एंजलसमोरच अखिल यांचा मृत्यू झाला.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group