बाप रे ! उशीखाली लपून बसला अत्यंत विषारी साप, पुढे काय झालं ? (Watch Video)
बाप रे ! उशीखाली लपून बसला अत्यंत विषारी साप, पुढे काय झालं ? (Watch Video)
img
DB
आपला झोपण्याचा बेड आणि उशी म्हंटल की जाणवतो तो निवांत पणा आणि आराम, पण एका घरातील बेड उशी ही झोप उडवणारीच ठरली आहे.  एका घरात उशीखाली विषारी साप सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये एका घरातील बेडवर उशीच्या खाली लपलेला एक अत्यंत विषारी साप आढळला. परंतु, उशीखाली साप असल्याचं समजल्याने मोठा अनर्थ टळला. सर्पमित्राने या सापाला पकडले आणि त्याला जंगलात सोडून दिले. नागपूरमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल  होत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे मानवाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे. विशेषतः पावसाळ्यात साप निवारा शोधण्यासाठी घरात आश्रय घेतात. रहिवाशांना सतर्क राहण्याचे, नियमितपणे त्यांचे बेडिंग तपासण्याचे आणि साप दिसल्यास स्थानिक सर्पमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group