कोलकातामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर शारिरीक अत्याचार केल्यानंतर हत्या झाल्याची घटना मागील आठवड्यात समोर आली होती. त्यापाठोपाठ आता राज्यात ठाणे, बदलापूर पुण्यातून देखील अशा घटना समोर आल्या आहेत. दरम्यान बदलापूरमधील चिमुकल्यांवरील अत्याचाराची घटना समोर असताना आता नागपूर जिल्ह्यातून देखील अशीच धक्कादायक घटना समोर आलीय.
नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात आठ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. कामठीमध्ये आठ वर्षीय बालिकेवर शेजारी राहणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेमुळे कामठी शहरात मोठी खळबळ उडाली होती.
नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , नागपूरमध्ये कामठी शहरात एका ५० वर्षीय व्यक्तीने पीडित मुलीला खाण्याचे आमिष दाखवले. घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने या आठ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीन घडलेल्या प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस ठाणं गाठलं. तक्रार नोंदिवल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलीय.
आरोपी कोण आहे?
आदेश वासनिक, असं आरोपीचं नाव असून त्याला अटक करण्यात आलीय. घरी कोणी नसल्याने शेजारी राहणाऱ्या आठ वर्षे बालिकेला खाऊ विकत घेऊन देण्याची बतावणी करत तिला घरात बोलावलं. पीडित मुलगी एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिच्यावर अत्याचार केलाय. घडलेला प्रकार पिडितेने आईला सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी पोक्सोसह इतर गुन्हे नोंदवून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
दरम्यान या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. तर राज्यात पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आलाय.