दुर्दैवी..! सुसाट कार रेलिंगला धडकली , दोघांचा मृत्यू ; ३ जखमी
दुर्दैवी..! सुसाट कार रेलिंगला धडकली , दोघांचा मृत्यू ; ३ जखमी
img
Dipali Ghadwaje
पुण्याच्या खडकीमधील हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच नागपूर जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव कार उलटून हा अपघात झाला असून यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील नागपूर कोराडी मार्गावर पांजरा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी आहेत. चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार पलटी झाल्याने ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कसा घडला अपघात? 

आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. तीव्र गतीने येणारी एक स्विफ्ट कार रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या रेलिंगला धडकली आणि त्यानंतर अनियंत्रित होऊन कार पलटी घेऊन अनेक मीटर लांब जाऊन थांबली.  या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघे गंभीर जखमी आहेत. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना नागपूरच्या दोन वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group