हिंजवडी : हिंजवडी - माण रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे शुक्रवारी (दि. २४) दुपारी पावणे चारच्या सुमारास भीषण अपघात झाला. रेडिमीक्सने भरलेला डंपर पलटी होऊन दुचाकीस्वार दोन तरुणी जागीच ठार झाल्या. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पुण्यातील हिंजवडीत मोठा अपघाताची घटना घडलीय. भरधाव वेगानं निघालेला रेडिमिक्स डंपर पलटी होऊन हा अपघात झाला. या अपघातात दोन तरुणींचा जागीच मृत्यू झालाय. यामध्ये डंपरखाली दुचाकीवर असलेल्या दोन महिलांचा दबून मृत्यू झालाय. वाहन वळवत असताना डंपरवरील चालकाचा सुटल्यानं हा अपघात झाला.
मिळालेली अधिक माहिती अशी की , डंपरखाली दुचाकी दबल्यानं दुचाकीवरील दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला आहे. क्रेनच्या साह्यानं रेडिमिक्स डंपर हटवण्यात आला. चालकाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मृत महिलांची ओळख पटवण्यात येत आहेत. पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार या तरुणींचं वय २० ते २५ वर्षे असून त्या नोकरी करत होत्या.
असा घडला अपघात
माण रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे रेडिमिक्स डंपर पलटी होऊन दोन तरुणी जागीच ठार झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार रेडिमिक्सने भरलेला डंपर (एमएच 12/एक्सएल 5744) हिंजवडीकडून महाळुंगेच्या दिशेला चालला होता. वडजाईनगर कॉर्नर येथे वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटला आणि तो पलटी झाला. त्याचवेळी स्कुटरवरून चाललेल्या दोन तरुणी डंपर खाली आल्या. त्यात त्यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनास्थळी हिंजवडी पोलीस पोहचत क्रेनच्या सहाय्याने रेडिमिक्स डंपर उचलून दोघींना बाहेर काढण्यात आले. दोन्ही तरुणींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दोन्ही तरुणी आयटी अभियंता असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस अपघाताचा तपास करीत आहेत.