पुण्यातून अपघाताची बातमी समोर आली आहे. वडगाव ब्रिजच्या जवळ झालेल्या अपघातात दोन तरूणांचा मृत्यू झालाय. थांबलेल्या बसला स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. यामध्ये जोन जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर चार जणांना रूग्णालयात दाखल कऱण्यात आलेय, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , शनिवारी सकाळी पाच वाजताच्या सुमारास बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिज जवळ थांबलेल्या बसला मागून येणाऱ्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात झाला. स्विफ्ट कारमधील चालक दारू प्यायला होता की डुलकी लागली, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
मित्राच्या वाढदिवसाला काही तरूणांनी स्विफ्ट गाडी काढली. रात्री वाढदिवसाचे एन्जॉय केलं. पहाटे पुण्याकडे येत असताना वडगाव ब्रिजच्या जवळ उभ्या असलेल्या बसला मागून स्विफ्ट गाडीने जोरदार धडक दिली. स्विफ्ट कारमध्ये सहा जण होते, त्यामधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलेय. चौघांना नवले रूग्णालयात उपचारासाठी आधी दाखल कऱण्यात आले, त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलेय.
वडगाव ब्रिज जवळ थांबलेल्या बसला कारने मागून जोरदार धडक दिली. पहाटे पाच वाजता झालेल्या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.