अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रत्नागिरीमध्ये भीषण अपघातामध्ये उच्चशिक्षित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. रात्रीच्या सुमारास ही घटना घडलीडंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे रत्नागिरीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबात मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा महामार्गावर काम करणाऱ्या इगल इन्फ्रा कंपनीच्या पाण्याच्या डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये उच्चशिक्षित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रत्नागिरीतल्या हातखंबा इथे रात्री हा अपघात झाला. या अपघातामध्ये शिशिर रावणंग या ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
शिशिर रावणंग हा तरुण रत्नागिरीतल्या निवळी या गावामध्ये राहणारा होता. घराच्या दिशेने येत असताना ही अपघाताची घटना घडली. तरुणाच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळताच निवळी गावावर शोककळा पसरली आहे.
या घटनेप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.