२२ जानेवारी २०२५
कर्नाटकमध्ये बुधवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. फळं आणि भाज्या घेऊन जाणारा ट्रक दरीमध्ये कोसळला. या अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे.
Copyright ©2026 Bhramar