नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या कारचा नागपूर बायपासवर उमरेड फाट्याजवळ अपघात झालाय. सध्या उपचार सुरु आहेत.
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आटोपून मुंबईमार्गे भंडाऱ्याकडे परत येत असताना खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. भंडारा गोंदिया जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या कारला आज पहाटे अपघात झाला.
नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ ही घटना घडली. अचानक समोरून आलेल्या ट्रकमुळे खासदार पडोळे यांच्या कार चालकाचे कारवरील संतुलन बिघडले आणि ही कार ट्रकला धडकली. या अपघातात खासदार पडोळे थोडक्यात बचावले. ते जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सध्या उपचार सुरु आहेत.