सौदी अरेबियात बसचा भीषण अपघात, ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू
सौदी अरेबियात बसचा भीषण अपघात, ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
सौदी अरेबियातील मदिना येथे झालेल्या एका भीषण रस्ते अपघातामध्ये ४२ भारतीय नागरिकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये मदिना येथे तीर्थयात्रेसाठी गेलेले भारतीय नागरिक होते.हे सर्वजण हैदराबाद आणि तेलंगणा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

मक्काहून मदीनाला जात असताना मुफरीहाटजवळ बस एका डिझेल टँकरशी धडकली, ज्यामुळे भीषण आग लागली. या आगात बसमधील 43 पैकी 42 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 20 महिला आणि 11 चिमुकल्यांचा समावेश आहे. तर बसमधील एक प्रवासी बचावला. घटनेत वाचलेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सौदीतील बद्र-मदिना महामार्गावर रविवारी रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार) हा अपघात झाला. याठिकाणी प्रवासी बस आणि एका डिझेल टँकरची जोरदार धडक झाली. ही धडक झाल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला. त्यामुळे प्रवाशांच्या बसला आग लागून त्यामधील प्रवाशी मृत्युमुखी पडले.

मक्का येथील दर्शन घेऊन हे सर्व भाविक मदिना येथे परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला. या दुर्घटनेनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत करण्याच्या सूचना सरकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

या दुर्घटनेबाबत सौदी किंवा भारतीय सरकारकडून अद्याप मृतांच्या अधिकृत संख्येची घोषणा करण्यात आलेली नाही. सौदी अरेबियातील स्थानिक यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपासणी आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group