शालेय विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणारी बस उलटली ; कुठे घडली घटना?
शालेय विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणारी बस उलटली ; कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला. अहिल्यानगर- मनमाड महामार्गावर ही घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जात असताना ही बस उलटली. सुदैवाने या अपघातामध्ये काही विद्यार्थी जखमी झालेत. तसंच कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरमध्ये शालेय सहल घेऊन निघालेली बस उलटली. अहमदनगर जिल्ह्यातील चिंचोली फाटा येथे ही घटना घडली.

अहमदनगर - मनमाड महामार्गावर भरधाव वेगात असलेली ही बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.

राहुरी येथून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन ही खासगी बस निघाली होती. पण अहमदनगर - मनमाड महामार्गावर चिंचोली फाटा येथे पिकअपने हुलकावणी दिल्याने अपघात झाला. बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये उलटली. या अपघातामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर स्थानिक नागिरकांनी तात्काळ मदतकार्य करत विद्यार्थ्यांना बसच्या बाहेर काढले. या अपघातामध्ये विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group