भीषण अपघात ! २ कारची समोरासमोर धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू
भीषण अपघात ! २ कारची समोरासमोर धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू
img
दैनिक भ्रमर
वाहनांच्या अपघातामध्ये वाढ होताना दिसत आहे. हरियाणाच्या कुरूक्षेत्र परिसरातून भीषण रस्ता अपघाताची माहिती समोर आली आहे. कुरुक्षेत्र परिसरात दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. दोन भरधाव वाहनांची समोरासमोर टक्कर झाल्यानं मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, अनेक जण जखमी आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, कुरूक्षेत्र कैथल रोडवर हा भीषण अपघात घडल्याची माहिती आहे. सकाळच्या सुमारास दोन भरधाव वाहने समोरासमोर आदळली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच खिडकीतून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हे सर्वजण देवीच्या जागरण कार्यक्रमातून परतत होते. मृत व्यक्ती यमुनानगरचे रहिवासी असल्याची माहिती आहे. 

हा अपघात पिंडारसी आणि घराडसी या गावांदरम्यान घडला आहे. मृतांमध्ये चालक प्रवीण पुत्र स्वराज वासी बूबका, पवन पुत्र बालकिशन, राजेंद्र पुत्र बालकिशन, उर्मिला पत्नी पवन आणि संजयची पत्नी सुमन यांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघातात गंभीर जखमी असलेल्या रुग्णांवर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group