ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध निवेदक प्राध्यापक श्रावण गिरी यांचं निधन
ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध निवेदक प्राध्यापक श्रावण गिरी यांचं निधन
img
Dipali Ghadwaje
बीडमध्ये रस्ता ओलांडनाता एका ट्रॅव्हल्सखाली येऊन ज्येष्ठ साहित्यिक आणि निवेदक असलेले प्राध्यापक श्रावण गिरी यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.  श्रावण गिरी हे कर्जत येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू होते. बीडमध्ये ट्रॅव्हल्स खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार , छत्रपती शिवाजी महाराज चौकात सपना ट्रॅव्हल्सनं त्यांना धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. मूळचे बीड जिल्ह्यातल्या घाटनांदुर गावचे असलेले प्राध्यापक श्रावण गिरी हे कर्जत येथे प्राध्यापक म्हणून रुजू होते. काही कामानिमित्त ते  छत्रपती संभाजीनगर आले होते. काम आटोपून ते कर्जतला परतत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. 

रविवारी संध्याकाळी  छत्रपती संभाजीनगर वरून कर्जतला जाण्यासाठी ते बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले होते. तिथून ट्रॅव्हल्सने जाण्यासाठी ते रस्ता ओलांडत असताना सपना ट्रॅव्हल्सने त्यांना धडक दिली. त्यामध्ये त्यांच्या पायावरून गाडी गेल्याने ते खाली पडले. 

चौकात असलेल्या काही प्रत्यक्षदर्शी तरुणांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे गिरी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group