छत्रपती संभाजीनगर : गहू साठवणूक करणारे बॉयलर कोसळल्याने मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेक अनेक कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीत बॉयलर कोसळल्याने चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे घठनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटना स्थळी पोहोचले आहेत. तसेच या फॅक्ट्रीमध्ये बचावकार्यही सुरू आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ,संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीत बॉयलर कोसळल्याने अपघात झाला आहे. गहू साठवणूक करणारे बॉयलर कोसळल्याने चार कामगार दगावल्याची प्राथमिक माहिती आहे. इतर कामगारांना शोधण्याचे शोध कार्य सुरू आह. रेडिको या कंपनीचे गहू साठवणूक करणारे बॉयलर कोसळले आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे बॉयलर कोसळल बॉयलर अंगावर कोसळल्याने काही कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. जखमी मजुरांनी तात्काळ जवळील रुग्णालयात हलवण्यात आळे आहे.