धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन ; मस्साजोगमध्ये काय घडतंय?
धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन ; मस्साजोगमध्ये काय घडतंय?
img
Dipali Ghadwaje
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिन्यांहून अधिक कालावधी उलटला आहे. तरी अद्याप याप्रकरणातील एक आरोपी फरार आहे.  तर इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. त्यातच आता संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे वाल्मिक कराडवर मोक्का लावावा अशी मागणी केली जात आहे.

या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मस्साजोगमधील ग्रामस्थांकडून सध्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखही सहभागी झाले आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आक्रोश मोर्चा काढण्यात आले. त्यातच आज मस्साजोगच्या आंदोलकांनी आक्रमक होत आंदोलन केले. त्यातच आज सकाळपासून संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख गायब झाले होते. त्यांचा मोबाईल स्विच्ड ऑफ होतो. त्यानंतर धनंजय देशमुख यांच्यासाठी गावकऱ्यांनी शोधकार्य सुरु केले. यानंतर त्यांच्या घरात रडारड सुरु झाली. काही वेळा पासून धनंजय देशमुख यांचा संपर्क होत नव्हता. ते कुठे गेले तेही कुटुंबाला माहिती नव्हते. त्यांचा मोबाईलही स्विच ऑफ होता.

यानतंर धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढल्याची माहिती समोर आली. धनंजय देशमुख यांनी  भाऊ संतोष देशमुख याला न्याय मिळावा, यासाठी आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून ‘करो या मरो’ आंदोलन सुरु केले आहे.

धनंजय देशमुख यांची प्रकृती अस्वस्थ झाली आहे. यानंतर धनंजय देशमुख यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी बातचीत केली. “मी शांतपणे आंदोलन करतोय, मी न्याय मागतोय, पण माझा गैरफायदा घेतला जात आहे. मी न्यायाची भीक मागतोय”, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.

दरम्यान  “माझ्या भावाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, माझ्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, माझ्या चांगुलपणाचा किती फायदा घेणार. जर माझ्या चांगल्यापणाचा असा किती फायदा करुन घेणार आहात. मी शांतपणे आंदोलन करतोय, मी न्याय मागतोय, पण माझा गैरफायदा घेतला जात आहे. मी न्यायाची भीक मागतोय. पोलिसांनी माझी अजिबात चौकशी केली नाही. त्यांनी मला तुमचा कोणावर संशय आहे का, अशी चौकशी पोलिसांनी केली नाही. घटनाक्रम विचारला जात नाही. गाडी सापडली, चिठ्ठी सापडली याबद्दलही काहीही विचारले नाही. तपासाबद्दलही विचारलं जात नाही. मनोज दादांवरही केस टाकली जात आहे. न्याय मागताना केस दाखल केल्या जात असतील तर मी न्याय कशासाठी मागू”, असे धनंजय देशमुख म्हणाले.

 
beed |
इतर बातम्या
Join Whatsapp Group