भीषण अपघात : मध्यरात्री भरधाव वेगात येणाऱ्या दोन कार समोरासमोर आदळल्या ; 3 जणांचा मृत्यू
भीषण अपघात : मध्यरात्री भरधाव वेगात येणाऱ्या दोन कार समोरासमोर आदळल्या ; 3 जणांचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास झालेला एक अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे. बीडच्या अहमदपूर - अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला असून मध्यरात्रीच्या सुमारास दोन कार एकमेकांना समोरासमोर धडकल्याने 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत आणि मृतांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत 

मध्यरात्रीच्या वेळी अहमदपूर - अहमदनगर महामार्गावर दोन कार भरधाव वेगाने समोरासमोर धडकल्या. धडक इतकी जोरदार होती की, दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जखमी गंभीर अवस्थेत होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अपघात झाल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तातडीने पोलीस आणि आपत्कालीन सेवेला माहिती दिली. युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.

या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलीस प्रशासनाने तत्काळ व्यवस्था लावून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, वेगावर नियंत्रण नसल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group