मोठी बातमी : वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी
मोठी बातमी : वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी
img
Dipali Ghadwaje
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडी तपासाला  वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा  स्वत:हून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. यानंतर नियमानुसार आरोपी वाल्मिक कराड याचं मेडिकल करण्यात आलं.

त्यानंतर त्याला तातडीने बीडच्या केज कोर्टात रात्री उशिरा हजर करण्यात आलं. यावेळी आरोपीच्या रिमांडबाबत सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा जोरदार युक्तिवाद केला.

तर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आले आहेत. मग जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद कराडचे वकील अशोक कवडे यांनी केला आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

रात्री 10 वाजेनंतर केजच्या कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ऐकण्यासाठी कोर्टाच्या बाहेर कराड समर्थक आणि विरोधकांची तुफान गर्दी झाली होती.

या पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरात प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला. त्यानंतर कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. सीआयडीने 15 दिवसाची कोठडी मागितली होती. पण कोर्टाने 14 दिवसाची कोठडी दिली आहे. सीआयडीचं हे मोठं यश असल्याचं सांगितलं जात आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group