वाल्मिक कराड प्रकरणात भाजपच्या 'या' बड्या नेत्याची 'सीआयडी' कडून चौकशी, नेमकं काय घडतंय ?
वाल्मिक कराड प्रकरणात भाजपच्या 'या' बड्या नेत्याची 'सीआयडी' कडून चौकशी, नेमकं काय घडतंय ?
img
दैनिक भ्रमर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकारणही चांगलेच तापले आहे. सर्वच स्थरातून या घटनेचा जोरदार निषेध होत आहे.  दरम्यान, या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असल्याचा सातत्याने आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर वाल्मिक  कराडने एका खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सीआयडीला सरेंडर केलं आहे. यानंतर वाल्मिक कराडची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात येत आहेत. आता या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे.

यामध्ये वाल्मिक कराड याने पुण्यामध्ये देखील बेनामी संपत्ती जमवल्या असल्याचा सीआयडीला (CID) संशय आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका इमारतीमध्ये दोन ऑफिस कराड यांच्या दुसऱ्या पत्नी मंगल जाधवच्या नावावर असल्याचं समोर आलं होतं. यासंदर्भात सीआयडी कडून चौकशी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पुण्यातील एका भाजपच्या माजी नगरसेवकाची चौकशी सीआयडीने केली आहे.

वाल्मिक कराडप्रकरणी पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची आज सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. पुण्यात वाल्मिक कराडची दुसरी बायको मंगल जाधवच्या नावे पुण्यात जागा खरेदी करण्यात आली. या या खरेदीमध्ये खाडेंनी मध्यस्थी केला असल्याचा संशय सीआयडीला आहे. या संशय असल्याच्या पार्श्वभूमीवर दत्ता खाडे यांची सीआयडीने चौकशी केली असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान खाडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की , वाल्मिक कराडचे संबंध असल्याचा संशय सीआयडीला होता. म्हणून आज त्यांनी मला चौकशीला बोलावलं होतं. माझी चौकशी झाली, मी जी काही उत्तर द्यायची आहेत, ती दिली आहेत. माझे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध होते, तेव्हा माझी कराडशी तोंड ओळख आहे.वाल्मिक कराडशी माझा कोणत्याही प्रकरणात संबंध नाही. माझी चौकशी झाली, मी सीआयडीला सहकार्य केलं आहे, असं खाडे म्हणाले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group