मोठी बातमी ! वाल्मिक कराडला थेट जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस, ''हे'' आहे  कारण
मोठी बातमी ! वाल्मिक कराडला थेट जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस, ''हे'' आहे कारण
img
दैनिक भ्रमर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरल. दरम्यान , वाल्मिक कराडच नाव सरपंच देशमुख हत्या प्रकरणात समोर आलं नसलं तरी तपास यंत्रणांकडून त्याचे लिंक शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्या वाल्मिक कराड दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेत आहे. 

या सगळ्या घडामोडीनंतर वाल्मिक कराडला जिल्हा प्रशासनानेही दणका दिला आहे. वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द केला असून लवकरात लवकर शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वाल्मिक कराडसह 100 जणांना नोटीस बजावली आहे. लवकरात लवकर शस्त्र जमा केलं नाही, तर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसमधून दिला आहे.

दरम्यान ,  वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहेत. त्यामुळे त्याच्यापर्यंत ही नोटीस पोहोचली नाही. तो तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ही नोटीस त्याला पुन्हा पाठवली जाऊ शकते. त्यानंतर त्याच्याकडील शस्त्र जमा केलं जाईल, अशी माहिती समजत आहे. वाल्मीक कराड याच्यावर तब्बल 15 गुन्हे दाखल आहेत. आता त्याला जिल्हाधिकाऱ्याने दणका देत नोटीस पाठवली आहे.

 मागील काही काळात बीड जिल्ह्यात एकूण 1281 जणांना शस्त्र परवाने दिले होते. यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 2005 जणांना दिलेल्या शस्त्र परवान्यांचा पुनर्विचार व्हावा, असा अहवाल बीडचे तत्कालीन अधीक्षक अविनाश बारगळ यांनी वरिष्ठांकडे पाठवला होता. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी १०० जणांचे शस्त्र परवाने रद्द केले होते. यात वाल्मिक कराडचा देखील समावेश होता. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group