वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे घनिष्ठ संबंध, पण … ''या''  केंद्रीय मंत्र्यांने केले मोठे विधान
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे घनिष्ठ संबंध, पण … ''या'' केंद्रीय मंत्र्यांने केले मोठे विधान
img
दैनिक भ्रमर
बीडमधील  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या घटनेचा सर्वच स्तरातून विरोध होत आहे. दरम्यान, या हत्याकांडामागचे सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा दावा विरोधक करत आहेत. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने केली जात आहे. त्यातच आता यावर महायुतीच्या एका केंद्रीय मंत्र्यांने थेट विधान केले आहे.


केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना नुकतंच धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्याप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे एकमेकांसोबत घनिष्ठ संबंध होते. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचा थेट संबंध असेल असं मला वाटत नाही, असे रामदास आठवले म्हणाले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group