टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू संजय बांगरच्या मुलाचं नाव आर्यन बांगर आहे. तो गेल्या वर्षीपर्यंत मुलगा होता. पण, हार्मोन समस्येमुळे त्यानं त्याचं लिंग बदललं. संजय बांगर यांच्या मुलाने नुकतेच लिंग बदल केले आहे. दरम्यान, आता अनाया बांगर हीने क्रिकेट वर्तुळात भूकंप आणणारा गौप्यस्फोट केला आहे.
संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर लिंग बदलून मुलगी झाला आहे. आता अनाया बांगर अशी त्याची नवीन ओळख आहे. अनाया बांगरने अलिकडेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक खुलासे केले आहेत. या मुलाखतीत तिने ट्रान्स वुमन म्हणून तिचा अनुभव शेअर केला. त्यासोबत एका सिनिअर क्रिकेटर तिला अश्लील फोटो पाठवल्याचा आणि शरीरसुखाची मागणी करून गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.
अनाया बांगर या मुलाखतीत म्हणते की, लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर मला काही लोकांचा पाठिंबा मिळाला, तर काही लोकांनी मला त्रासही दिला. काही क्रिकेटपटूंनी मला त्याचे अश्लील फोटो पाठवले. तसेच जेव्हा मी भारतात होते, तेव्हा मी एका जुन्या क्रिकेटपटूला माझ्या परिस्थितीबद्दल सांगितले.त्यावेळेस त्याने मला,'चल गाडीत जाऊया, मला तुझ्यासोबत झोपायचे आहे, अशी मागणी केली होती,असा खुलासा अनाया बांगरने केला.
दरम्यान, लिंग बदल करण्याआधी अनायाची आर्यन बांगरी अशी ओळख होती.आर्यन म्हणून ओळख असताना त्याने यशस्वी जैस्ववाल सरफराज खान आणि मुशीर खान यांच्यासोबतही क्रिकेट खेळले आहे.