राज्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत असून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरनानंतर बीड मधील अनेक गुन्हे सध्या उगघडकीस येत आहेत. दरम्यान, आता अशीच एक धक्कादायक घटना बीडमधील परळी येथे घडली आहे.

परळीमध्ये टोकवाडी परिसरात लिंबुटा येथील शिवराज दिवटे या युवकाला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यात जखमी झालेल्या शिवराज वर आंबेजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जाऊन भेट घेतली तसेच तब्येतीची विचारपूस ही केली. यावेळी मनोज जरंगे पाटील यांचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे उपस्थित होते.
धनंजय देशमुख म्हणाले, माझे बंधू संतोष अण्णा यांना ज्या पद्धतीने मारहाण केली तसाच हा प्रकार आहे रिंगण करून मारले आहे. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपींना पकडून कठोर शासन करावे तरच कायद्याचा जरब राहिल. अजित दादांना भेटून या संदर्भात निवेदन देणार आहे
शिवराज दिवटे हा तरुण त्याच्या मित्रासोबत एका कार्यक्रमाला गेला होता. जेवण करत असताना काही अनोळखी व्यक्तींसोबत त्याचे किरकोळ भांडण झाले होते. या भांडणाची कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. गावाकडे परत निघालेल्या शिवराज दिवटेला पेट्रोलपंपाजवळ गाठून काही ओळखीच्या व काही अनोळखी तरुणांनी त्याला जगदिश्वराच्या डोंगरावरून खाली उतरवले. दुसऱ्या दुचाकीवर बसवून रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात घेऊन गेले. त्या ठिकाणी मला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. मारहाण करताना ते याचा संतोष देशमुख पार्ट टू करू असं म्हणत होते. नंतर तिथेच तरुणाला बेदम मारहाण केली होती.