धंनजय मुंडे याना मोठा धक्का मिळाला असून माझगाव कोर्टाने राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली असून करुणा शर्मा यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यानंतर करूणा शर्मा माध्यमांशी बोलताना एक मोठा खुलासा केला आहे. मुंडेंविरोधात बोलल्यास माझ्या मुलीला उचलून नेण्याची धमकी देण्यात आल्याचे देखील करुणा शर्मा यांनी सांगितले. माझगाव कोर्टाने राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली असून करुणा शर्मा यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यानंतर करूणा शर्मा माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे
करूणा शर्मा म्हणाल्या, न्यायाधीशांचे आभार मानते की मला न्याय मिळाला, सत्याचा विजय झाला आठव्यांदा मी धनंजय मुंडे यांना तोंडावर पाडलंय.महिलांसाठी ही एक आदर्श केस देशासाठी ठरली .मी खरी होते म्हणून मंत्र्याला हरवू शकले. मीच पहिली बायको असल्याचे सिद्ध झालंय.त्यासाठी पोटगी मिळालीय. लग्नाचे फोटो आणि फोटो मी मीडियावर टाकणार आहे.
मुंडेविरोधात बोलल्यास माझ्या मुलीला उचलून नेण्याची धमकी दिली जात आहे.शिवानीला उचलून नेण्याची धमकी मला त्याचे लोक देतात. मी तक्रारही केली असून आज पाच सहा दिवस झाले आहेत. मुंडेंचे आणि परळीचे लोक आहेत ज्यांनी व्हॉटसअपवर धमकी दिली आहे. जेव्हा धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईल तेव्हा माझा मोठा विजय असेल, असे करुणा शर्मा म्हणाल्या.
करूणा मुंडेला प्रेमजाळ्यात फसवून लग्न केल्यास त्याला 20 लाख देण्याचे षडयंत्र सुरू आहे. धनंजय मुंडेंची गँग हे षडयंत्र रचत आहे.धनंजय मुंडेंचे डोके एवढं नाहीय. बीडचा आका आत गेलाय पण पुण्याचा आका हे आता काम करतोय.राज घनवट,तेजस ठक्कर यांनी काही लोकांना मला फसवून लग्न करण्यासाठी 20 कोटी ऑफर दिली. पुण्याचा आका वेगळा आहे.राज घनवट 2500 कोटीचा मालक आहे, तो कुठल्या महिलांवर खर्च करतो . बायकोसाठी खर्च नाही करत पण तो पैसा कुठं जातो ते मी सांगणार असल्याचे करुणा शर्मा म्हणाल्या.