हिट अँड रन ! भरधाव दुचाकीच्या धडकेत शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
हिट अँड रन ! भरधाव दुचाकीच्या धडकेत शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
img
संपादकीय
हिट अँड रन च्या अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. अशीच एक हिट अँड रन च्या भीषण अपघाताची एक बातमी समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता कि या अपघातातील शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. अशा घटना वारंवार घडणे म्हणजे चिंताजनक बाब आहे. 

भरधाव दुचाकी चालकाने एका शालेय विद्यार्थिनीला धडक दिली. या भीषण अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. विद्यार्थिनी शाळेतून घरी चालली होती, यावेळी अपघातात मृत्यू झाला आहे. वसई मध्ये हा अपघाताचा थरार घडला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, वसईत आज दुपारी 12.30 वाजता हिट ॲण्ड रनच्या घटनेत एका14 वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शाहिस्ता इम्रान शाह (14) असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती वाजा मोहल्ला, पापडी येथे राहात होती.शाहिस्ता उजेफा उर्दू हायस्कूल, कोळीवाडा येथील नववीची विद्यार्थिनी होती. शाळा सुटल्यानंतर ती नेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी बस पकडण्यासाठी निघाली होती. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी वाहनाने तिला जोरदार धडक दिली. या घटनेत शाहिस्ता गंभीर जखमी झाली होती आणि तिला तात्काळ वसईच्या कार्डीनल ग्रेसेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group