नागपूरमधून एक धकाकदायक बातमी समोर आली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरलं आहे. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन जणांची हत्या करण्यात आली आहे. परिसरातल्या वसंतराव नाईक झोपडपट्टीमध्ये दोन जणांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सागर मसराम याचा जागीच मृत्यू झाला तर लक्ष्मण गोडे याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते, तेव्हा त्याने प्राण सोडले.
सागर मसराम हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जुन्या वादातून दोघांवर हल्ला करून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हत्या प्रकरणात चंदू नावाच्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास वसंतराव नाईक झोपडपट्टीमध्ये सागर मसराम आणि लक्ष्मण गोडे या दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मृत्यू झालेले आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत, दोन वर्षांपूर्वी ते एकमेकांचे मित्र होते, पण आरोपी चंदू सागरविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यासोबत राहत नव्हता. 2 वर्षांपूर्वी भांडणाच्या वेळी मदतीसाठी बोलावलं होतं, पण तो गेला नाही, त्याबद्दल मनात राग होता.
मृतकाचा अबू अझिज बेग नावाचा मित्र आहे, त्याच्याविरोधात कोर्टाने 302 मध्ये वॉरंट काढला होता, त्यानंतर पोलिसांनी बेगला अटक केली होती. अजिज बेग आणि आरोपींमध्ये दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून अजिजला अटक करण्यात आली आहे, असा गैरसमज मयत झालेल्यांचा झाला होता. यानंतर ते आरोपीच्या घरी गेले आणि शिवीगाळ केली, यानंतर आरोपी चंदूने घरातील रॉडने सागर आणि लक्ष्मण यांच्या डोक्यावर हल्ला केला, यात दोघांचाही मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.