नाशिक - नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर हॉटेलमध्ये रोटी दिली नाही म्हणून वेटरवर सर्व्हिस रिव्हॉल्वर रोखणारा पोलीस कर्मचारी झगडे याला नाशिक ग्रामीण पोलिसांनी निलंबित केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस कर्मचारी विशाल झगडे याने नाशिकरोड रेल्वे स्थानकाबाहेरील हॉटेल रामकृष्ण येथे शुक्रवारी रात्री १२.३० रोटी दिली नाही म्हणून वेटरवर सर्विस रिवाल्वर रोखल्याची घटना घडली होती. सागर निंबा पाटील (वय २७, रा. आगरटाकळी) हे हॉटेल रामकृष्णमध्ये व्यवस्थापक म्हणून काम पहातात. त्यांनी फिर्याद दिली असताना नाशिककडून पोलिसांनी विशाल झगडे याला जेलरोड येथील निवासस्थानामधून शनिवारी सायंकाळच्या सुमारास अटक केली.
याबाबतचा तपास सुरू असून नाशिक ग्रामीण पोलिसांना याबाबतचा अहवाल नाशिक रोड पोलिसांनी पाठविल्यानंतर आज सकाळी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी या वादग्रस्त विशाल झगडे याला निलंबित केले आहे. त्याबाबत आदेश काढण्यात आला असून त्याची खातेनिहाय चौकशी देखील सुरू केली आहे.