माजी क्रिकेटर विनोद कांबळीने गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. विनोद कांबळीच्या दुसऱ्या पत्नीनेही त्याला घटस्फोट दिला अशी चर्चा रंगली होती. नुकताच वानखेडे मैदानाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विनोद कांबळी आणि त्याची दुसरी पत्नी अँड्रिया हेविट आले होते. खुद्द अँड्रिया हेविटने आपल्या घटस्फोटाबद्दल सांगितलंय.
पत्नी अँड्रियाने सांगितलं की, त्यांनी 2023 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. एवढंच नाही तर ती कांबळीला सोडून घरातून निघून गेली होती. पण त्यांचा घटस्फोट झालेला नाही. एका मुलाखतीत अँड्रियाने घटस्फोटाचा निर्णय का बदलला याबद्दल सांगितलंय.
सुर्यांशी पांडे यांनी अँड्रियाला विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना अँड्रिया म्हणाला की, 'मी कोणत्याही मित्रालाही संकटात सोडणार नाही, तो तर माझ्यासाठी माझ्या मित्रांपेक्षाही अधिक आहे. मी त्याला सोडू शकत नाही. तो मला आता आमच्या मुलांसारखाच आहे. त्याला त्रासात पाहून मला त्रास होतो.' ती पुढे म्हणाली की, मी निघून गेले होते. पण माझ्या मनात विचार यायला लागले की तो कसा असेल, त्याने काही खाल्लं असेल का, तो आरामात झोपू शकला असेल का? मी जेव्हा परत आले तर, तेव्हा त्याची परिस्थिती पाहून मी समजून गेले की त्याला माझी गरज आहे.'