''त्या'' हॉटेल मालकाच्या  मृत्यू प्रकरणातील आरोपींना आळंदीतून अटक, दोघांची लग्न मोडली
''त्या'' हॉटेल मालकाच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींना आळंदीतून अटक, दोघांची लग्न मोडली
img
दैनिक भ्रमर

गेल्या काही दिवसांपासून बीडमधील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान काल बीड मधून एक  धक्कादायक बातमी समोर आली होती. भांडण सोडवायला गेलेल्या हॉटेल मालकाचा हाणामारीत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दरम्यान आता या प्रकरणात अपडेट समोर आली आहे. 


माजलगाव येथील ढाबा मालकाच्या हत्या प्रकरणातील सर्व सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे यापैकी तिघेजण आळंदी येथे लपून बसले होते त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कालच ताब्यात घेतले होते. तर आज सकाळी उर्वरित तिघांना गावाजवळच्या शेतातून ग्रामीण पोलिसांनी अटक केली.. रोहित थावरे, ऋषिकेश थावरे कृष्णा थावरे, शुभम वावळकर अजय सहजराव व अभिजीत घायाळ अशी या आरोपींची नावे आहेत..

हॉटेलमधील ग्राहकांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल मालकाच्या महागात पडले असून यामध्ये हॉटेल मालकाचा मृत्यू झाला आहे. ढाबा मालकाच्या खून प्रकरणातील दोन आरोपींचे विवाह निश्चित झाले होते. परंतु आता हे दोघे खून प्रकरणातील आरोपी असल्याने मुलीकडील मंडळींनी या विवाहास नकार दिल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

महादेव गायकवाड असे ढाबा चालवणाऱ्या मालकाचे नाव आहे. रविवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास काही तरुण ढाब्यावर जेवायला आले. जेवण झाल्यानंतर आरोपींनी बाहेरून दारू आणली आणि ते पित बसले होते. दरम्यान दारू पिताना त्यांच्यात भांडण झाली. ही भांडण सोडण्यासाठी हॉटेल मालक महेश गायकवाड आणि त्यांचा मुलदा आशुतोष गायकवाड मध्यस्ती करण्यासाठी गेले. त्यानंतर आरोपींनी मालकाशी वाद घालायला सुरुवात केली, हा वाद इतका पेटला की तरूणांनी शिवीगाळ करत मालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी हॉटेल नुकसान केले, पैसे चोरले , मारहाण केली आणि निघून गेले या भांडणात महादेव गायकवाड हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group