धक्कादायक ! अल्पवयीन मुलीने केली प्रियकराची हत्या,  मित्रांसोबत रचला कट
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीने केली प्रियकराची हत्या, मित्रांसोबत रचला कट
img
दैनिक भ्रमर
गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत असून अतिशय शुल्लक अशा कारणावरून किंवा एखाद्या गोष्टीचा राग मनात ठेऊन गंभीर गुन्हे केले जातात. अशीच धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एक अल्पवयीन मुलीने आपल्या मित्रांच्या साहाय्याने प्रियकराची हत्या केली असल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागात घरकुल परिसरातून हा प्रकार समोर आला आहे. बालाजी उर्फ बाळू मंचक पांडे, असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.

अल्पवयीन गर्लफ्रेंडने तिच्या मित्रांच्या मदतीने प्रियकराचा खून केला आहे. अपघाताचा बनाव करून प्रेयसीने मित्रांच्या मदतीने 28 वर्षांच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने गर्लफ्रेंड आणि तिच्या मारेकरी मित्रांचा शोध घेतला आहे. याप्रकरणी अल्पवयीन गर्लफ्रेंडला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर तिच्या मित्रांना अटक करण्यात आली आहे. 

प्रियकर सतत त्रास देत असल्याने प्रेयसीने तिच्या काही मित्रांच्या मदतीने बालाजी याच्या डोक्यात आणि पायावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली, यात बालाजीचा रुग्णालयात दाखल करण्याआधीच मृत्यू झाला. प्रेयसी आणि तिच्या मित्रांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मयत बालाजीचा अपघात झाला आहे, असा खोटा बनाव करून त्याला पिंपरी चिंचवडच्या वाय.सी.एम रुग्णालयात दाखल केलं.

प्रेयसीच्या मित्रांनी बालाजीला रुग्णालयात दाखल करताना त्यांची नावं खोटी सांगितली, अखेर पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही आणि तपासाची चक्र फिरवली आणि ते मुख्य आरोपीपर्यंत पोहोचले, तेव्हा अल्पवयीन मुलीने झालेला सर्व प्रकार सांगितला, त्यानंतर पोलिसांनी आरोपी दिनेश सूर्यकांत उपादे, आदित्य शरद शिंदे याला अटक केली आहे, तसंच सहआरोपी म्हणून प्रेयसी असलेल्या अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडविरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने यांनी सांगितलेल्या माहितीवरून अन्य आरोपींच्या शोधात बीड जिल्ह्यात एक पथकही रवाना झालं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group