मोठी बातमी ! भारताचा तुर्कीला आणखी एक मोठा दणका, नक्की काय घडतंय ?
मोठी बातमी ! भारताचा तुर्कीला आणखी एक मोठा दणका, नक्की काय घडतंय ?
img
नंदिनी मोरे
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव चांगलाच वाढला. दरम्यान,  तुर्कीने भारत आणि पाकिस्तान वादात उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला त्यानंतर आता भारतानं तुर्कीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतीय व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या मालावर बहिष्कार घातला आहे.यांनतर आता मोठी बातमी समोर येत आहे, भारत सरकारने तुर्कस्तानविरोधात आता आणखी एक मोठी कारवाई केली आहे. 

राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत, नागरी विमान वाहतूक ब्युरो (Bureau of Civil Aviation) कडून तुर्की विमानतळ ग्राउंड हँडलिंग कंपनी सेलेबीची एअरपोर्ट सर्व्हिसची सिक्योरिटी क्लीयरंस रद्द करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिस भारतातील 8 विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवते.

या प्रकरणात शिवसेनेकडून देखील आंदोलन करण्यात आलं होतं. मुंबई विमानतळावर सेलेबी या कंपनीकडून सेवा पुरवली जात होती, या कंपनीचा करार रद्द करून तिच्यासोबत असलेले सर्व संबंध संपुष्टात आणावेत अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई विमानतळावरील जवळपास 70 टक्के ग्राउंड ऑपरेशन्स सेलेबीच्या माध्यमातून केले जातात. ज्यामध्ये प्रवाशांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधा, उड्डाण ऑपरेशन्स, कार्गो आणि पोस्टल सेवा यासारख्या सेवांचा समावेश आहे. मात्र भारताने आता या कंपनीला मोठा दणका दिला आहे.

दरम्यान ,  तर बॉलिवूडने देखील तुर्कीवर बहिष्कार घातला आहे, इथून पुढे एकही चित्रपट किंवा मालिकाचं चित्रिकरण तुर्कीमध्ये होणार नसल्याची भूमिका भारतामधील चित्रपट व्यावसायिकांकडून घेण्यात आली आहे. या बहिष्काराचा मोठा फटका हा तुर्कीला बसल्याचं पाहायला मिळत आहे. तुर्कीचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group