पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांचा हसतानाचा व्हिडीओ व्हायरल !
पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांचा हसतानाचा व्हिडीओ व्हायरल !
img
दैनिक भ्रमर
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे काल म्हणजेच संपूर्ण देशाला हादरवून सोडणारा दहशतवादी हल्ला झाला.जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील  बैसरन परिसरात झालेल्या हल्ल्यामुळे देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.  या हल्ल्यात २७ ते २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला आहे. दरम्यान आता या हल्ल्यानंतरचा स्थानिक नागरिकांचा एक व्हिडिओ  व्हायरल झाला असल्याची माहिती आहे.    

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पहलगाममधील  काही नागरिक हल्ल्याबाबत मीडिया प्रतिनिधींशी संवाद साधताना दिसतात. या संवादादरम्यान, एका व्यक्तीने हल्ल्यामुळे दु:ख व्यक्त केलं असतानाच त्याच्या मागे बसलेला दुसरा व्यक्ती हसताना दिसतो. या हास्याने अनेकांचे रक्त उकळले असून, देशातील सामान्य नागरिक यामुळे संतप्त झाले आहेत.

हा प्रकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. लोक प्रश्न विचारत आहेत की एवढ्या मोठ्या राष्ट्रीय शोक प्रसंगी हसण्यासारखे नेमकं काय होतं? या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला असून, दहशतवादी थेट पर्यटकांना त्यांच्या धर्मावरून लक्ष करत होते, हे देखील समोर आले आहे

इतर बातम्या
Join Whatsapp Group