नाशिक( प्रतिनिधी)- 23 जानेवारीपासून महाराष्ट्र बडोदा हा रणजी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी बडोदा संघाचे काल आगमन झाल्यानंतर आज मंगळवारी सकाळी त्यांनी सराव केला.
सकाळच्या सत्रात कृणाल पांडे आणि आणि महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हे सराव करतांना दिसत नसल्याने उपस्थित चाहते नाराज झाले होते. मात्र दुपारनंतर बडोद्याचा कर्णधार कुणाल पांडे हा आल्यानंतर उपस्थित तरुण वर्गामध्ये एकच जल्लोष निर्माण झाला. कुणाल पांडेची स्वाक्षरी घेण्यासाठी गर्दी केली होती. तर तर काहींना कुणाल बरोबर सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. या तरुण वर्गाला योग्य प्रतिसाद प्रतिसाद देत स्वाक्षऱ्या केल्या. दुपारी अडीच वाजेपर्यंत घाम गाळत सराव केला.