विधासभा निवडणुकीत महायुती सरकारला घवघवीत यश मिळाले असून महाविकास आघाडी सरकारला दारुण पराभव सहन करावा लागला आहे. दरम्यान त्यानंतर राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आला असून उद्धव ठाकरे गटाला अनेक धक्के बसत आहेत.
ठाकरे गटाला आता नाशिकमध्ये आणखी एक मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या दोनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला आहे. यावेळी शिवसेनेचे सचिव भाऊ चौधरी आणि उपनेते विजय करंजकर यांची देखील उपस्थिती होती. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याचे संकेत मिळत आहेत, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.तसेच,या पक्षप्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची ताकत आता आणखी वाढली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर आता ठाकरे गटातील अनेक नेते पदाधिकारी हे शिवसेनेते प्रवेश करताना दिसत आहेत. याचा मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला आगामी निवडणुकांमध्ये बसू शकतो.