धक्कादायक !  थ्रेशर मशीनमध्ये अडकून शेतमजुराचा भयानक मृत्यू
धक्कादायक ! थ्रेशर मशीनमध्ये अडकून शेतमजुराचा भयानक मृत्यू
img
दैनिक भ्रमर
   अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे.  शेतात हरभरा काढत असताना थ्रेशर मशीनमध्ये हरभऱ्याची मळणी करताना अचानक पाय घसरून शेतमजुराचा थ्रेशरमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील खल्लार जवळील बेंबळा खुर्द शेत शिवारात घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शेत मजूर अमोल अनिल डिके (वय 37, राहणार खल्लार) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. बेंबळा खुर्द शिवारात अनिल कळके या शेतकऱ्याची शेती आहे. त्यांच्या शेतात हरभरा काढणीचे काम सुरू होते. दुपारी हरबरा पिकांची मळणी सुरू असताना मृतक अमोल डिके हा हरभऱ्याच्या गंजीवर चढून थ्रेशरमध्ये हरभरा टाकत होता. यावेळी हरभऱ्याची गंजी उंच असताना अचानक शेतमजुराचा पाय घसरून तो थ्रेशरमध्ये पडला, यावेळी थ्रेशर चालू होतं.

मृतक अमोलचा डावा पाय प्रेशर च्या पट्ट्यात अडकून थ्रेशरमध्ये गेला. यामुळे अमोल डिके याच्या पायाचे अक्षरशः हजारो तुकडे झाले. उपस्थितीत शेतमजूर आणि शेतकऱ्यांनी तातडीने मशीन थांबवली आणि त्याला बाहेर काढलं. रक्तबंबाळ अवस्थेत अमोलला उपस्थित मजुरांनी दवाखान्यात नेण्यासाठी धावधाव सुरू केली. काही जणांनी रुग्णालयात तातडीने सूचना देऊन ॲम्बुलन्स गाडी बोलावली.

काही वेळात रुग्णवाहिका दाखल झाली. अनिलची परिस्थिती अत्यंत गंभीर स्थिती होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने अमरावती येथील रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे शिवारात खळबळ उडाली आहे. फक्त एका चुकीमुळे अनिलला आपला जीव गमवावा लागला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group