पहलगाम हल्ल्यावरून अबू आझमी यांनी केलं ''हे'' मोठं वक्त्यव्य, म्हणाले...
पहलगाम हल्ल्यावरून अबू आझमी यांनी केलं ''हे'' मोठं वक्त्यव्य, म्हणाले...
img
दैनिक भ्रमर

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे. तसेच,  या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, आता पहलगाम हल्ल्यावरून अबू आझमी यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. 

पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यावर आता पहिल्यांदाच सपा नेते अबू आझमी यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. काश्मीरच्या पहलगाममध्ये जे झालं त्यावर सगळेच मुस्लीम ओरडून सांगत आहेत, आम्ही सरकार बरोबर आहोत. सरकारने या दहशतवाद्यांविरोधात  कठोर ॲक्शन घ्यावी अशी ते मागणी करत असल्याचं आझमी यांनी यावेळी म्हटलं आहे.

दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, कारण त्यांना हे चांगलं माहीत होतं की असं केलं तर भारतामध्ये हिंदू -मुस्लीम होईल.  ज्या ठिकाणी हल्ला झाला, तेथील मुस्लीम बांधव बचावासाठी धावून आले, मदत कर्य केलं. मात्र भारतातील मुसलमान लोकांना अशी वागणू का दिली जात आहे? असा सवाल यावेळी आझमी यांनी उपस्थि केला आहे.

ज्यांनी हिंदूंना मारले त्यांना मारा आम्हाला का त्रास देत आहात? मुंबईच्या दादरसह भारतात अनेक ठिकाणी मुस्लीम लोकांना मारहाण केली जात आहे.  सगळ्यात मोठी बाब म्हणजे निवडून आलेले आमदार देखील अशी वक्तव्य करत आहेत. संविधानाची शपथ घेऊन नितेश राणे रत्नागिरीत जाऊन हनुमान चालीसा वाचायला सांगत  आहेत. हिंदू मुस्लीम करत आहेत,   मी पंतप्रधान , सरकार, मोहन भागवत यांच्यासह सर्वांना विनंती करतो की जातीयवाद होऊ देऊ नका. यासंदर्भात एक पत्रक काढून आदेश देण्याची गरज आहे. सरकार ज्या गोष्टी आणत आहेत, त्या सगळ्या मुस्लिम विरोधात आहेत. वक्फ बोर्ड कायदा तोही मुसलमान विरोधात आहे, तो आम्हाला नको आहे.  सगळे हिंदू मुस्लिम यांना लढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपही यावेळी आझमी यांनी केला आहे.

मी दोन वेळा नितेश राणे यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटलो. पत्रही दिले आहे. आता पुन्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना पत्र देणार आहोत, असंही यावेळी आझमी यांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group