काळ्याफिती लावून मुस्लिम बांधवाचा जुम्माचा नमाज
काळ्याफिती लावून मुस्लिम बांधवाचा जुम्माचा नमाज
img
दैनिक भ्रमर
मालेगाव - केंद्र सरकारने सुरू केलेल्या नवीन वफ बोर्ड कायद्याच्या विरोधामध्ये आज सार्वजनिक नमाज पठन काळ्याफिती लावून करण्यात आले. 

केंद्र सरकारने अलीकडच्याच काळामध्ये वफ बोर्ड कायदा मंजूर केलेला आहे. त्यानुसार या ठिकाणी आता मुस्लिम सदस्य राहणार नाही हे स्पष्ट झाले आहे. हा सगळा प्रकार वादादित असतानाच याला विरोध करण्यासाठी आज दुपारी जुम्माचे नमाज पढताना मालेगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी या घटनेचा निषेध केला. आपल्या उजव्या हाताच्या दंडावर काळी फित बांधून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

नाशिक शहरामध्ये देखील काही मशिदींमध्ये असाच निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. तर शेजारी असलेल्या धुळे जिल्ह्यामध्ये देखील दुपारी तीन वाजता जुम्माचा नमाज पठण करत असताना असाच काळ्याफिती बनवून निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारने घेतलेली भूमिका ही मुस्लिम बांधवांना मान्य नसल्याचे यावेळी मुस्लिम बांधवांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group