जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन पर्यटक जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना घेरलं आहे. सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.
दक्षिण काश्मीरमधील पहलगाम भागात हा दहशतवादी हल्ला झाला आहे. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला आहे. या घटनेने परिरसरात खळबळ उडाली आहे.
दहशतवादी हल्ल्यात काही पर्यटक जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केलाय. हल्ल्यात एकूण ६ जखमी झाले आहेत. ४ पर्यटक आणि दोन घोडेवाले जखमी झाले आहेत.
दहशतवाादी हल्ला झाल्यानंतर सुरक्षादलाने सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अपघातातील जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका ग्रुपला लक्ष्य केलं. सुरक्षादलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा शोध सुरु केला आहे.
पहलगाम पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी होते. दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेला पर्यटकांचा ग्रुप हा राजस्थानातील आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, हल्ल्यात जखमी झालेल्या दोन पर्यटकांची प्रकृती नाजूक असल्याचं बोललं जात आहे. हल्ल्यात जखमी झालेल्यांची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांचा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.