पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामध्ये संतापाचे वातावरण असतानाच जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये गुरुवारी सकाळी चकमक सुरू होती. यामध्ये चकमकीत भारतीय जवानाला वीरमरण आले आहे. जम्मू काश्मीरमधील उधमपूर येथे सकाळपासूनच दहशतवादी आणि भारतीय लष्करात चमकक सुरू होती.
उधमपूरमध्ये काही दहशतवादी दबा धरून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. त्यानंतर भारतीय जवानांकडून सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आले. यावेळी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दहशतवाद्यांशी दोन हात करताना एका जवानाला वीरमरण आले आहे.
गुरुवारी सकाळी उधमपूर जिल्ह्यातील दुदू-बसंतगड परिसरात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत एका भारतीय जवानाला वीरमरण प्राप्त झालं आहे, तर काही जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेने संपूर्ण देशात संताप आणि शोक व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वीच पहलगामध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप २८ पर्यटकांचा जीव घेतला आहे. त्यामुळे संतापाची लाट असतानाच पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोके वार काढले आहे. भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. पण यामध्ये एका जवानाला वीरमरण आले.