मोठी बातमी : पाकिस्तानात गेलेला जवान भारतात परतला ; पाकिस्तानने BSF जवानाला 20 दिवसांनी सुखरूप सोडलं
मोठी बातमी : पाकिस्तानात गेलेला जवान भारतात परतला ; पाकिस्तानने BSF जवानाला 20 दिवसांनी सुखरूप सोडलं
img
Dipali Ghadwaje
ऑपरेशन सिंदूरनंतर टरकलेल्या पाकिस्ताने भारताच्या BSF जवानाला 20 दिवसांनी सुखरूप सोडलं असून, शॉ हे चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानी रेंजर्सने ताब्यात घेतले होते.

पीके शॉ यांच्या परतीबाबत सीमा सुरक्षा दलाने एक निवेदन जारी केले आहे. ज्यात बीएसएफने सांगितले आहे की, आज (दि.14) बीएसएफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ हे अटारी-वाघा सीमेवरून भारतात सुखरूप परतले आहेत.

शॉ २३ एप्रिल २०२५ पासून पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात होते. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता जॉइंट चेक पोस्ट अटारी मार्गे शॉ यांना भारताच्या ताब्यात देण्यात आले असून, हे सर्व कारवाई शांततेत आणि स्थापित प्रोटोकॉलनुसार पार पडल्याचे BSF ने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने घेतला पहलगामचा बदला 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बदला घेत पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूप वाढला होता. या हल्ल्यांमध्ये जवळपास 100 अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यात दहशतवाद्यांचाही सहभाग आहे.


 
  
  
  
  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group