नवी दिल्ली : बंदी घालण्यात आलेली नक्षलवादी संघटना ULFA(I) उल्फाच्या काही शिबीरांवर भारतीय सैन्य दलाने हल्ला केल्याचा दावा उल्फाकडून करण्यात आला आहे.
म्यानमार येथील संघटनेच्या कॅम्पवर भारतीय सैन्य दलाने ड्रोन हल्ले केले असून या हल्ल्यात संघटनेचा एक नेता मृत्यूमुखी पडला असून 19 जण जखमी झाल्याचा दावाही संघटनेच्यावती अधिकृतपणे दिलेल्या माहितीत करण्यात आलाय. मात्र, भारतीय सैन्य दलाकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे.
भारतीय सैन्य दलाच्या प्रवक्त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना हा दावा फेटाळला.
लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी म्हटले की, अशाप्रकारच्या कुठल्याही हल्ल्याची आम्हाला माहिती नाही. भारतीय सैन्य दलाने अशाप्रकारचे कुठलेही ऑपरेशन केलं नाही, याची माहिती नाही.
मात्र, उल्फा संघटनेनं ड्रोन हल्ल्यात संघटनेतील वरिष्ठ नेता ठार झाला असून 19 जण जखमी झाल्याचा दावा केला आहे. उल्फाच्या दाव्यानुसार, या ड्रोन हल्ल्यात एनएससीएन च्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं आहे.