धक्कादायक ! सुप्रसिद्ध अभिनेत्रीकडून हिट अँड रन; विद्यार्थ्याला चिरडून पळाली, अखेर अभिनेत्रीला अटक
धक्कादायक ! सुप्रसिद्ध अभिनेत्रीकडून हिट अँड रन; विद्यार्थ्याला चिरडून पळाली, अखेर अभिनेत्रीला अटक
img
वैष्णवी सांगळे
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रुद्र' या गाजलेल्या आसामी चित्रपटात सुरभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नंदिनी कश्यप हिला पोलिसांनी 'हिट अँड रन' प्रकरणात अटक केली आहे. गुवाहाटी पोलिसांनी सांगितलं की, नंदिनी कश्यपच्या गाडीनं एका 21 वर्षीय मुलाला चिरडलं होतं. 29 जुलै रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

रिपोर्टनुसार, नलबारी पॉलिटेक्निकच्या एका २१ वर्षीय तरुणाला ज्याचे नाव समीउल हक आहे, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. समीउल हक हा गुवाहाटी नगर निगम टीममध्ये नाइट शिफ्टमध्ये काम करत होता. तो स्ट्रीटलाईट ठीक करण्याच्या कामात लागला होता. पण नंदिनीने केलेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता तर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

धक्कादायक ! मैत्रिणी रुममधून बाहेर गेल्या परत येताच दिसलं असं काही की...

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी  एका खाजगी वृत्तवाहिनीला  सांगितलं की, विद्यार्थ्याला चिरडल्यानंतर नंदिनी त्याला मदत करण्यासाठी थांबली नाही आणि गाडी घेऊन पळून गेली. समीउल हकसोबत त्यावेळी त्याचे मित्रही होते, त्यापैकी काही मित्र अभिनेत्रीचा पाठलाग करत काहिलीपारा येथील अपार्टमेंटमध्ये पोहोचले, जिथे नंदिनी कथितपणे तिची गाडी लपवण्याचा प्रयत्न करत होती. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, ते अभिनेत्रीशी वाद घालतानाही दिसत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group