अबबब..! घराच्या बाथरूममध्ये आढळले चक्क ३५ जिवंत साप ; VIDEO पाहून उडेल थरकाप
अबबब..! घराच्या बाथरूममध्ये आढळले चक्क ३५ जिवंत साप ; VIDEO पाहून उडेल थरकाप
img
Dipali Ghadwaje
अंगावर काटा आणणारी बातमी आहे. नागाव जिल्ह्यातील एका घरात ३५ हून अधिक साप आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडओ पाहून नेटकऱ्यांना धक्क बसला आहे. 

एका वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एका मोठ्या खडकाच्या फटीमधून अनेक साप बाहेर पडताना दिसत आहेत. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रहिवासी सापांना मोठ्या टाकीत गोळा केल्याचे दिसत आहे.

आसाममधील नागाव जिल्ह्यातील कालियाबोर भागात एका घरात सुमारे ३५ जिवंत साप आढळल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. प्राणीप्रेमी संजीब डेका यांनी हे साप पकडले आहेत,” एएनआयने लिहिले.


व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर ९३, ०३,००० पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले,”शौचालय बांधण्यासाठी चांगली जागा नाही, नंतर साप पुन्हा येऊ शकतात,” एका वापरकर्त्याने केली. “बाप रे माझ्या घरी साप दिसला तर मी मरून जाईन),” असे दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले. 

एका वृत्त संस्थेशी बोलताना संजीब डेका म्हणाले, “घर मालकाने मला सापांच्या उपस्थितीची माहिती दिली आणि मी घटनास्थळी पोहोचलो. त्या ठिकाणी बरेच साप रेंगाळत असल्याचे मला आढळले. मी घराच्या नवीन बांधलेल्या शौचालयातून सुमारे ३५ जिवंत साप वळवळत होते. नंतर मी जोसागर दलानी परिसरात सापांना सोडले.  
snake | aasam |
इतर बातम्या
Join Whatsapp Group