साप म्हटलं की अगोदर पळापळ सुरू होते. जो तो सुरक्षित ठिकाणी धाव घेतो. विषारी सापाने दंश केला तर काही मिनिटात त्या मनुष्याचा, प्राण्याचा मृत्यू अटळ असतो. पण महाराष्ट्रात असे एक गाव आहे जिथे पाळीव प्राण्यांप्रमाणे सापांना वागवले जाते. या गावातील लहान पोरं खेळण्यांसोबत नव्हे तर जिवंत सांपासोबत खेळतात, कारण् त्यांच्याकडे घरात साप पाळले जातात.
शेटफळ हे गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात असून तिथले लोकं चक्क खतरनाक अशा कोब्रा सापांसोबत बिनधास्त जगतात. तिथल्या जवळपास प्रत्येक घरात साप दिसतीलआणि हे साप फक्त घरांतच नव्हे तर शेतात, झाडांवर आणि बेडरूमच्या आतही आढळतील. गावातले लोक या सापांना अजिबात घापरत नाहीत, उलट त्याच सापांसोबत एकाच छताखाली शांतपणे जगतात.
या गावात कोब्रा साप हे वन्यजीव नाहीत, तर कुटुंबाचा भाग आहेत. यामुळे शेटफळ गाव हे महाराष्ट्रातील रहस्यमयी गाव म्हणूनही ओळखले जाते. येथे विषारी साप आणि मानव एकाच छताखाली शांततेने राहतात. शेटफळमध्ये कोब्रा सापांसाठी एक खास ठिकाण आहे, ज्याला 'देवस्थानम' म्हणतात. मनुष्य आणि सापाचे नाते जगभरातील लोकांना आकर्षित करते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इतक्या सापांमध्ये राहूनही गावातील लोकांना साप चावण्याची, त्यांच्या दंशाची भीती वाटत नाही. ते म्हणतात की साप त्यांना कधीही चावत नाहीत. साप हे माणसांसारखेच प्राणी आहेत आणि त्यांनाही प्रेम तसेच आदरही हवा असतो, असा त्यांचा विश्वास आहे. शेटफळ गाव आता पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र बनले आहे. हे गाव पाहण्यासाठी लोक दूरदूरून येतात. गावकरी पर्यटकांना सापांबद्दल सांगतात आणि सापांना कसे हाताळायचे हे देखील शिकवतात.