बहीण झाली वैरीण ! नवऱ्यासोबत मिळून सख्ख्या भावाची हत्या, भावाचे हत्याचे 'हे' कारण समोर
बहीण झाली वैरीण ! नवऱ्यासोबत मिळून सख्ख्या भावाची हत्या, भावाचे हत्याचे 'हे' कारण समोर
img
वैष्णवी सांगळे
काही दिवसांवरच रक्षाबंधन सण ठेपला आहे. भाऊ आणि बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. पण या भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना कर्नाटक येथे घडली आहे. एका बहिणीन पतीसोबत मिळून आपल्या 23 वर्षीय भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

२५ जुलै रोजी चित्रदुर्गातील होलालकेरे तालुक्यातील एका गावात एका २३ वर्षीय तरुणाचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. अपघातानंतर त्याला होलालकेरे तालुक्यातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात येणाऱ्या रक्त तपासणीत डॉक्टरांना तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. याबद्दल डॉक्टरांनी त्याच्या बहिणीला माहिती दिली. 

वेदनादायक ! शिवभक्तांवर काळाचा घाला; घटनास्थळी भाविकांच्या आक्रोशाने वातावरण सुन्न, कुठे घडली घटना? वाचा

आपल्या भावाला एचआयव्हीची लागण झाल्याचे समजताच बहिणीला धक्का बसला. तिने याबबत घरातील इतर कोणालाही न सांगता केवळ आपल्या पतीला याबद्दल माहिती दिली. समाजात या बातमीमुळे कुटुंबाची नाचक्की होऊ नये म्हणून पीडित तरुणाच्या बहिणीने आणि भावोजीने मिळून त्याला संपवण्याचा कट रचला.बेंगळुरूमधील रुग्णालयात उपचार करून घेण्याच्या बहाण्याने दोघेही त्याला सोबत घेऊन गेले. 

हृदयद्रावक ! “पप्पा, बघा तुम्ही म्हणत होता, जाऊ नको, पण मी गड चढला” …वडील आणि लेकीचा तो फोन मात्र शेवटचा ठरला

वाटेत एका निर्जन ठिकाणी थांबून दुपट्ट्याने पीडित तरुणाचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह परत आपल्या गावी आणला. त्यांनी कुटुंबाला सांगितले की बेंगळुरूला जाताना त्याचा वाटेत मृत्यू झाला. तरुणाच्या अंत्यसंस्कारादरम्यान, गावकऱ्यांना त्या तरुणाच्या मानेवर काही खुणा दिसल्या. त्यांना संशय आला आणि त्यांनी कुटुंबाला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर महिलेने संपूर्ण कहाणी तिच्या वडिलांना सांगितली.तरुणाच्या वडिलांनी होलालकेरे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणात, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या हत्येत सहभागी असलेल्या महिलेच्या पतीचा शोध सुरू आहे.
Murder |
इतर बातम्या
Join Whatsapp Group