हृदयद्रावक ! “पप्पा, बघा तुम्ही म्हणत होता, जाऊ नको, पण मी गड चढला” …वडील आणि लेकीचा तो फोन मात्र शेवटचा ठरला
हृदयद्रावक ! “पप्पा, बघा तुम्ही म्हणत होता, जाऊ नको, पण मी गड चढला” …वडील आणि लेकीचा तो फोन मात्र शेवटचा ठरला
img
Vaishnavi Sangale
करमाळा शहरातून हृदयदारक घटना समोर आली आहे. आई-वडिलांच्या विरोधाला न जुमानता सज्जनगड चढून गेलेल्या अवघ्या 16 वर्षांच्या मुलीचा तिथेच दुर्दैवी मृत्यू झालाय. श्रावणी राहुल लिमकर (वय 16) असं मृत चिमुकलीचे नाव आहे. तिच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सज्जनगड, सातारा यथे हा प्रकार घडल्याचे समोर आले असून तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अखेर शोकाकुल वातावरणामध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की श्रावणी करमाळ्यात इयत्ता 10वीमध्ये शिकत होती. तिच्या हृदयाला जन्मताच छिद्र होते आणि त्यावरच उपचार सुरू होते. रविवार 27 जुलै रोजी तिच्या क्लास मधील मुला-मुलींची सहल सज्जनगड येथे गेली होती. मात्र श्रावणीला धाप लागत असल्याने तिचे आई-वडील तिला सहलीला पाठवत नव्हते.पण मी गड चढणार नाही , मला कास पठार पहायचं आह असे सांगत श्रावणीने तिच्या पालकांकडे सहलीला जायची परमिशन मागितली. 

बहीण झाली वैरीण ! नवऱ्यासोबत मिळून सख्ख्या भावाची हत्या, भावाचे हत्याचे 'हे' कारण समोर

अखेर श्रावणी ही करमाळा येथील खाजगी शिकवणी घेत असलेल्या शहाणे क्लासेस मधील अकरा विद्यार्थी- विद्यार्थिनी व शिक्षकांसह खाजगी वाहनाने सहलीला गेली होती.तिथे जऊन सर्व मुला-मुलींसोबत श्रावणी सज्जनगड चढली, आपण हृदयाने कमजोर असताना देखील गडावर पोहचल्याचा आनंद झाला. अखेर तिने तिच्या वडिलांना मोबाईलवर फोन केला आणि “पप्पा, बघा तुम्ही म्हणत होता, जाऊ नको, पण मी गड चढला” अस तिने वडिलांना आनंदाने सांगितलं. 

मात्र तेवढ्यात ती खाली कोसळली. ते पाहून तिच्यासोबत असलेल्या मुलींनी तिला आधार देत गडाच्या खाली आणले व तिला तातडीने साताऱ्यातील खाजगी रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाचा श्रावणीचा मृत्यू झाला. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group