धक्कादायक!'जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली', पत्नीच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळुन पतीचा टोकाचा निर्णय
धक्कादायक!'जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली', पत्नीच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळुन पतीचा टोकाचा निर्णय
img
Vaishnavi Sangale
पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याच्या आपण अनेक घटना रोजच ऐकतो. पण उत्तर प्रदेश मध्ये मात्र याउलट घडलंय. उत्तर प्रदेशच्या बांदा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला वैतागून टोकाचे पाऊल उचलले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणाच्या पत्नीचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध सुरू होते. त्याची पत्नीदेखील प्रियकरासोबत राहत होती. घटनेच्या आधी पती पत्नीला समजवण्यासाठी गेला होता. मात्र तिने काहीही ऐकून न घेता. प्रियकरासोबत मिळून तिने पतीलाच मारहाण केली. त्यानंतरही पतीने तिला घरी येण्यास मनवले. मात्र नंतर प्रियकराने पतीला फोन करुन धमकी देण्यास सुरुवात केली. या घटनेमुळं पतीला अपमानित वाटले आणि या सगळ्याला वैतागून त्याने आत्महत्या करत जीवन संपवले. 

हृदयद्रावक ! “पप्पा, बघा तुम्ही म्हणत होता, जाऊ नको, पण मी गड चढला” …वडील आणि लेकीचा तो फोन मात्र शेवटचा ठरला

पोलिसांनी मयत व्यक्तीच्या मुलीच्या तक्रारीनुसार पत्नी आणि पतीवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोपांतर्गंत केस दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी पत्नी गुडिया आणि तिचा प्रियकर गोपालदासला अटक केली आहे. मुलीने तक्रारीत म्हटलं आहे की, तिची आई आणि तिचा प्रियकर यांच्यातील अनैतिक संबंधांमुळं तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group