'त्या' हत्या प्रकरणात , उपशहरप्रमुख कैलास धोत्रेसह एकूण 7 जणांना अटक
'त्या' हत्या प्रकरणात , उपशहरप्रमुख कैलास धोत्रेसह एकूण 7 जणांना अटक
img
दैनिक भ्रमर
भिवंडी शहरात अल्पवयीन मुलाचे अपहरण करून केलेल्या बेदम मारहाणीमुळे त्याची हत्या झाली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे यासोबत दोघा आरोपींना रात्री उशिरा शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. तर गुरूवारी एका आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याने एकूण अटक आरोपींची संख्या सात वर पोहचली आहे.

नेमकं काय घडलं? 
14 फेब्रुवारी रोजी शुल्लक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी नंतर शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे त्याचा मुलगा देवा तसेच इतर साथीदारांनी संकेत भोसले यांनी अल्पवयीन युवकाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण केल्याने तो जबर जखमी झाला होता. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल होते. दरम्यान उपचारा सुरू असताना संकेत भोसले याचा मृत्यू झाला. 

त्यानंतर पोलिसांनी संकेत भोसले यास जबर मारहाण करून हत्या केल्याच्या गुन्ह्यात कैलास धोत्रे याचे साथीदार करण लष्कर, दिनेश मोरे आणि चंदन गौड यांना यापूर्वी अटक केली होती. तर आता हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी या गुन्ह्यातील फरार आरोपींच्या शोधासाठी बनविलेल्या पोलिस पथकाने रात्री उशिरा मुख्य आरोपी शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे, आकाश जाधव, विशाल साबळे यांना अटक केली आहे. तर भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने ओम लोंढे यास अटक केली आहे. या तिघांना 26 फेब्रुवारी पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group