गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर या १९ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. आंदेकर आणि कोमकर यांच्या टोळी युद्धात मात्र आयुषला त्याचा जीव गमवावा लागला. अवघ्या १९ वर्षांच्या आयुषचा गुन्हेगारी विश्वाशी काहीही संबंध नसताना १२ गोळ्या झाडून त्याला मारण्यात आले. धक्कादायक म्हणजे त्यानंतर आरोपींनी संपूर्ण परिसरात ‘टपका रे टपका, एक और टपका’ हे गाणे स्पीकरवर लावले होते.
आंदेकर टोळीने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी डाव आखला होता. आयुषची हत्या केल्यानंतर स्पीकरवर लावलेलं गाणं आणि गोळ्या झाडून तिथून निघताना दोन्ही मारेकऱ्यांनी म्हटले की, इथे फक्त कृष्णा आंदेकर आणि बंडू आंदेकर चालणार. बाकी कोण नाय. आमच्या नादाला लागणार त्यांचं असंच होणार.’ यातूनच मारेकऱ्यांनी मानसिकता किती विकृत होती हे दिसून येत.
लहान भाऊ अर्णव कोमकरने याविषयी सांगितले की , आयुषची हत्या झाली तेव्हा तो लहान भावाला क्लासवरुन आणण्यासाठी गेला होता. बिल्डींगखाली पोहोचल्यानंतर आयुष गाडी पार्किंगमध्ये लावत होता. तेवढ्यात तेथे आंदेकर टोळीचे दोनजण आले आणि गोळ्या झाडू लागले. त्यांनी आयुषवर गोळ्या झाडल्या. ९ गोळ्या या आयुषच्या शरीरात शिरल्यामुळो तो जमिनीरवर कोसळला.
पुढे अर्णवने सांगितले की, पहिल्या दोन गोळ्या जेव्हा आयुषला लागल्या तेव्हाच तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर पोलिसांनी यायला जवळपास अर्धातास लावला. रुग्णवाहिका 40 ते 50 मिनिटांनी आली. तोपर्यंत बिल्डींगमध्ये असलेल्या डॉक्टरांना आयुषला तपासण्यासाठी बोलावले. ते रुग्णवाहिका बोलावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पोलीस केस असल्याचे सांगण्यात आले. तो पर्यंत आयुषचा मृत्यू झाला आणि त्याचा मृतदेह तेथेच पार्किंगमध्ये पडून होता.
स्पीकरवर लावलेल्या गाण्याबद्दल अर्णवने म्हटले की, ‘ते गाणे इकडे लागले नव्हते, ते गाणे आंदेकर चौकात लावले होते. आयुषवर हल्ला झाला तेव्हा आई कल्याणी कोमकर आणि बहिण अक्षता कोमकर दोघीही घरात होत्या. गोळ्या झाडून तिथून निघताना दोन्ही मारेकऱ्यांनी म्हटले की, इथे फक्त कृष्णा आंदेकर आणि बंडू आंदेकर चालणार. बाकी कोण नाय. आमच्या नादाला लागणार त्यांचं असंच होणार.’