नाशिक : तोतया पोलिसाकडून २१ लाखांची फसवणूक ; नेमकं काय घडलं ?
नाशिक : तोतया पोलिसाकडून २१ लाखांची फसवणूक ; नेमकं काय घडलं ?
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - पोलीस असल्याची बतावणी करीत मनी लॉण्डरिंग प्रकरणात सहभागी असल्याचे सांगून एका तोतया पोलिसाने तरुणाची २१ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

... तर विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत नाशिकमध्ये फिरून दाखवावं, संजय राऊतांचं फडणवीसांना आव्हान

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी यांना दोन वेगवेगळ्या क्रमांकांवरून फोनद्वारे व चॅटिंगद्वारे मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यातून सबइन्स्पेक्टर संदीप रॉय बोलत असल्याचे यांना सांगितले. समोरच्या व्यक्तीने फिर्यादी यांना फोन करीत “तुम्ही कॅनरा बँकेत क्रेडिट बनविले आहे,” असे सांगून तुम्ही ते मनी लॉण्डरिंग प्रकरणात वापरले आहे, असे म्हणाला. या प्रकरणात तुमचा सहभाग असून, तुम्हाला तुमचे सर्व आर्थिक तपशील व स्थावर मालमत्तेची माहिती आम्हाला द्यावी लागेल, असे सांगितले. 

माजी उपसरपंचाच्या आत्महत्येनंतर पूजा गायकवाडच्या फॉलोअर्समध्ये 'इतकी' वाढ

फिर्यादी घाबरल्याने त्यांनी सर्व माहिती समोरच्या व्यक्तीला दिली. त्या आरोपीने फिर्यादी यांना विविध बँक खात्यांमध्ये 21 लाख 13 हजार 236 रुपये वर्ग करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ते पैसे भरले. हा सर्व प्रकार दि. 16 जुलै ते 28 ऑगस्ट 2025 दरम्यान घडला. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित सायबर पोलीस ठाण्यात आपबिती सांगितल्यानंतर अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील करीत आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group